Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ठाण्यातील नौपाडा परिसरातील इमारतीला भीषण आग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ठाणे 17 नोव्हेंबर :-  तलावपाळी परिसरातील धवलछाया इमारतीला ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.यामुळे या परिसरात एकच हाहाकार उडाला असून घरात काही वयोवृद्ध अडकलेले आहेत अशीही खबर मिळत आहे. यापैकी एका वयोवृद्ध व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

तलावपाळी परिसरातील धवलछाया या तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन अग्नीशामक दल, एक मोबाईल टॉवर घटनास्थळी पोहोचले. यावेळी घरात वयोवृद्ध अडकले होते. वयोवृद्ध व्यक्तीला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. आग कमी झाली असून घरातून धुरांचे लोट बाहेर पडत आहेत. या इमारतीत बिल्डर वीर धवल घाग अडकल्याची माहिती मिळत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक उपस्थित आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.