Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एका जहाल माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

शासनाने जाहिर केले होते एकुण 06 लाख रूपयांचे बक्षिस.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 30 ऑगस्ट – केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम, एरिया कमिटी सदस्य, टेकनिकल टीम- वेस्ट सब झोनल ब्युरो, वय 42 वर्ष, रा. कोसमी नं. – 1 ता. धानोरा, जि. गडचिरोली याने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम दलममधील कार्यकाळ सन 2002 ते 2007 पर्यंत टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर कार्यरत होते. 2020 मध्ये एरिया कमिटी सदस्य पदावर बढती झाली तेव्हापासुन आतापर्यंत टेकनिकल टिम-वेस्ट सब झोनल ब्युरो येथे कार्यरत आहे.18 गुन्हे या कार्यकाळात केलेले आहे.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 25 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर,अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व  जसवीर ंिसंग, कमांण्डट 113 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विश्वंभर कराळे, प्रभारी अधिकारी पोमके सावरगाव यांनी ही कामगिरी पार पाडली.

यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली  नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.