Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 02 ऑगस्ट-  रस्ता बांधकाम विभागात कंत्राटदारांनी बिले काढण्यासाठी बांधकामावरील केलेल्या कामाची मोजमाप पुस्तिका देण्यासाठी एक लाख 70 हजार रुपयांच्या लाचेची कंत्राटदाराकडे मागणी करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. ही कारवाई १ ऑगस्टला धानोरा येथे बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात करण्यात आली.

अक्षय मनोहर आगळे वय 29 वर्ष वर्ग-3 असे कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. तो धानोरा येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागात कार्यरत आहे. तक्रारदार कंत्राटदाराने बोधनखेडा पोचमार्ग, तुमडीकसा- हिरंगे, रंगगाव गोटाटोला, मुरुमगाव- रिडवाही येथील रस्त्याची कामे केली होती. याची मोजमाप पुस्तिका (एम.बी.) देण्यासाठी कनिष्ठ अभियंता अक्षय आगळे याने 19 जून रोजी एक लाख 70 हजार रुपये लाचेची मागणी केली. कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर 27जूनला एसीबीने लाच मागणी पडताळणी केली असता त्याने लाच मागितल्याचे समोर आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अक्षय आगळे यास पकडण्यासाठी एसीबीने सापळा लावला, पण कुणकुण लागल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. मात्र, आधीच मागणी केलेली असल्याने अखेर १ ऑगस्टला त्यास अटक करण्यात आली. या कारवाईने बांधकाम विभागात कंत्राटदारांनी बिले काढण्यासाठी कशा प्रकारे अडवणूक केली जाते, हे समोर आले आहे.

गडचिरोली जिल्हात बांधकामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी चालते हे कारवाईने येतोय समोर ?

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बिले काढण्यासाठी बांधकामावरील केलेल्या कामाची मोजमाप पुस्तिका देण्यासाठी बिले काढण्यासाठी केलेल्या कामाच्या प्रमाणात टक्केवारीचे दर ठरलेले आहेत, त्यानुसार अधिकारी लाच उकळतात. धानोरातील कारवाईने बांधकाम विभागातील टक्केवारी चर्चेत आली आहे. ही कायवाही पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्रीधर भोसले, हवालदारराजेश पदमगिरीवार, अंमलदार संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके व प्रफुल डोर्लीकर यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.