Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आईने मुलीची हत्या करून स्वतःही घेतला गळफास.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, 9 जुलै – पती फिरायला घेऊन गेला नाही याचा राग मनात धरून एका मातेनं आपल्याच साडे चार महिन्याच्या चिमुकल्या मुलीची गळा आवळून हत्या करत नंतर गळफास घेत स्वतःही आत्महत्या केल्याची हृदय हादरवणारी घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे.

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या सिसने इथं राहणाऱ्या २३ वर्षीय मनीषा राजड या मातेनं आधी आपल्या साडेचार महिन्याच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिने स्वतः ही आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मनीषाचे पती हे मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करत असून ते नेहमीच घराबाहेर असत. पाऊस सुरू झाल्यानंतर ते घरी परतले. मात्र परवा ते पुन्हा आपल्या मित्रांसोबत फिरायला गेल्याचा राग मनात धरून मनीषाने हे धक्कादायक कृत्य केलं आहे . या प्रकरणात मयत मनीषा विरोधात आपल्याच चिमुकल्या मुलीची हत्या केल्या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या हृद्यविदारक घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

 

Comments are closed.