Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दूरसंचार सेवा सुरळीत राहण्याकरिता नवीन टॉवरची निर्मिती करावी. सिरोंचा येथील दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांना खा. अशोक नेते यांचे निर्देश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. ९ नोव्हेंबर:- राज्याच्या शेवटचा आणि जिल्ह्यातील दक्षिण भागाच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यात बीएसएनएल ची कनेक्टिव्हिटी सुरळीत राहत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या कोविड-19 प्रादुर्भावामुळे शाळा, कॉलेज बंद आहेत त्यामुळे विध्यार्थ्यांना ओंनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. याशिवाय काही कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या घरून (Work From Home) काम कराव लागत आहे. मात्र बीएसएनएल चे नेटवर्क राहत नाही परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत अनेकदा सिरोंचा येथील नागरिकांनी खा. अशोक नेते यांना निवेदन देऊन, फोन करून प्रत्यक्ष भेटून दूरसंचार च्या सेवेबाबत रोष व्यक्त केला होता. नागरिकांची अडचण लक्षात घेता खा. अशोक नेते यांनी जिल्हा दूरसंचार अधिकारी खंडेलवार, सिरोंचा चे जेटीओ कुमारस्वामी यांना दूरध्वनी करून  सिरोंचा येथील बीएसएनएल सेवेबाबत माहिती जाणून घेतली व फोन, मोबाईल व इंटरनेट सुविधा सुरळीत चालण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.    

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यासंदर्भात खा. अशोक नेते यांनी मोबाईल व इंटरनेट कनेक्टिव्हिटी ची माहिती घेतली असता सिरोंचा येथे दोन टॉवर असून वापर अधिक होत आहे त्यामुळे दूरसंचार संचावर अधिकचा भार पडत असल्याने कव्हरेज, इंटरनेटची स्पीड बरोबर मिळत नसल्याची खंत जिल्हा दूरसंचार अधिकारी खंडेलवार यांनी सांगितले. त्यानंतर खा. नेते यांनी बीएसएनएल ची तांत्रिक अडचण दूर करून सेवा सुरळीत करण्याचे निर्देश दिले तसेच टॉवर ची क्षमता कमी असल्यास नवीन टॉवरची निर्मिती करण्यासाठी  खाजगी जागा भाडेतत्वावर घेऊन नागरिकांना चांगल्या दर्जाची कनेक्टिव्हिटी देण्याचे निर्देश दिले व यासाह  जिल्ह्यात जिथे-कुठे कव्हरेज, कनेक्टिव्हिटीची समस्या असल्यास ताबडतोब तांत्रिकदृष्ट्या दूर करण्यासाठी कनेक्टिव्हिटी संदर्भात सर्वेक्षण करून प्रशासनाकडे पाठविण्याचे सांगितले. केंद्रीय दूरसंचार मंत्री मा.ना.श्री मनोजजी सिन्हा यांची भेट घेऊन कनेक्टिव्हिटी चर्चा केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद दिला असून. ४० नवीन टॉवरला लवकरात लवकरात मंजुरी देण्यात येईल यामुळे दुर्गम भागात चांगली सेवा मिळेल. अशी माहिती खा. नेते यांनी दिली.

Comments are closed.