Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती सप्ताह निमित्त कृषी विभागाची एक दिवसीय कार्यशाळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि.  2 फेब्रुवारी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती सप्ताह निमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी व्यवस्थापक प्रशांत धोंगडे उपस्थित होते. यावेळी कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रम समन्वयक श्रीमती हुसे, मंडळ कृषि अधिकारी भास्कर गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेअंतर्गत बँकेकडे कर्ज प्रकरणे प्रलंबित असलेले नव उद्योजक, जिल्ह्यातील सर्व जिल्हा संसाधन व्यक्ती, तालुक्यातील सर्व कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहायक उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सर्वात जास्त कर्ज प्रकरणे मंजूर करून घेण्यासाठी विशेष कार्य केल्याबद्दल जिल्हा संसाधन व्यक्ती अश्विनी ठेंगणे, प्रफुल्ल खोब्रागडे तसेच कृषी सहायक श्रीमती खिल्लारी, श्रीमती नाईक आणि सारिका गौंड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन दातारकर यांनी तर आभार रोशन गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तंत्र सहायक दशरथ तावाडे, मेघा धोत्रे तसेच तालुका कार्यालयातील कर्मचा-यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बेस्टमधील कंत्राटी कामगारांच्या कोविड काळातील थकित मानधनाबाबत त्वरित चौकशी करावी – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर

Comments are closed.