मंत्रालयातील अधिकारी वर्गाची रिक्त पदे व प्रशासकीय कामास गती देण्यासाठी कर्मचा-यांच्या पदोन्नती कार्यवाहीसाठी विशेष सेल तयार करावा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि ०६ नोव्हें. : राज्याचे प्रश्न व समस्या सोडविणे आणि राज्याला दिशा देण्याचे कामकाज मंत्रालयालयातून होत असताना, येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पदोन्नतीसंदर्भातील समस्या प्रलंबित राहिल्यास, अधिकारी वर्गाची पदे रिक्त राहून प्रशासकिय कामकाजात अडथळा निर्माण होणे योग्य नाही. मंत्रालयातील अनेक अवर सचिव, उपसचिव, सहसचिव या वरिष्ठ पदावर कर्मचा-यांची पदोन्नती न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार तातडीने करण्यात यावी. यासदंर्भातील कक्ष अधिकारी संवर्गाच्या ज्येष्ठता सुची जारी करावी. पदोन्नतीच्या कामांसाठी प्रदिर्घ कालावधी लागणार असल्याने विशेष सेल तयार करून या कामाच्या कार्यवाहीस गती द्यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
आज विधानसभेत मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिका-यांच्या पदोन्नत्या प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बोलत होते. या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सु.मो.महाडिक, विधि व न्याय विभागाचे बु.झ.सय्यद, वन विभागाचे अवर सचिव अ.म. शेट्ये, उपसचिव धनावडे, उपसचिव टि.वा.करपते आदीसह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, व्यवस्थेला दिशा देणारे कर्मचारीच अडचणीत असणे योग्य नाही, न्यायालयाने निर्णय देऊन पदोन्नतीसंदर्भातील प्रश्न प्रलंबित राहता कामा नये. तातडीने प्रशासनातील दोन्ही बाजू मांडून सेवा ज्येष्ठता यादी करून पुढील कार्यवाही करण्यास गती द्यावी. कक्ष अधिकारी १९८६ पासूनच्या ज्येष्ठता सुधारीत करण्याच्या कार्यवाहीस प्रदिर्घ कालावधी लागणार असून, या कामासाठी स्वतंत्र सेल तयार करावा असेही श्री पटोले यांनी सांगितले.
यावेळी मुख्य सचिव श्री संजय कुमार म्हणाले, मंत्रालयातील सह सचिव, उप सचिव तसेच अवर सचिव या पदावरील जागा रिक्त असल्याने, प्रशासकीय कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन सेवा जेष्ठता यादी अंतिम कराव्यात, त्यावर प्रतिक्रिया मागवाव्यात तसेच यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीस निर्णय घेण्यासंदर्भातील अहवाल सादर करावा. असेही श्री कुमार यांनी यावेळी सांगितले.
Comments are closed.