Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सरत्या वर्षात महावितरण चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत एकंदरीत १ हजार ३२४ वीजचोऱांना शॉक

६०३ आकडेबहाद्दर; ७२१ वीजग्राहकांची वीजेच्या मीटर्सषी छेडछाड ; १०८ वीजचोरांविरोधात पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. ३१ डिसेंबर : सरत्या वर्षात, महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत, डिसेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ या वर्षभराच्या कालावधित चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली जिल्हयांतर्गत सहाही विभागात, वीजचोरीविरूध्द विविध मोहिमा राबविण्यात आल्या.

या मोहिमांत चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयात एकंदरीत १ हजार ३२४ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी एकंदरीत २ कोटी २८ लाख रूपयांची वीजचोरी केल्याचे उघडकिस आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यात ६०३ वीजचेार हे आकडेबहाद्दर तर ७२१ वीजग्राहकांनी वीजेच्या मीटर्सषी छेडछाड करून वीजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या सर्व वीजचेारांनी एकंदरीत १५ लाख २५ हजार २०७ वीजेच्या युनिटसची वीजचेारी/बेकायदा वापर केला. १०८ वीजचोरांविरोधात पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्हयातील, चंद्रपूर विभागात २४ आकडा टाकूण वीज चोरणारे विभागात १३१ वीजमीटरर्सषी छेडछाड करणारे, वरोरा विभागात २२ आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व ९८ वीजमीटरर्सषी छेडछाड करणारे, बल्लारषा विभागात ५४ आकडा टाकूण वीज चोरणारे व १४२ वीजमीटरर्सषी छेडछाड करणारे, , ब्रम्हपुरी विभागात ६३ आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर तर ६४ वीजग्राहकांनी वीजेच्या मीटर्सषी छेडछाड करून वीजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर गडचिरोली जिल्हयातील, गडचिरोली विभागात ७७ आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर १४२ वीजमीटरर्सषी छेडछाड करणारे तर आलापल्ली विभागात३६३ आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व १४४ वीजग्राहकांनी वीजेच्या मीटर्सषी छेडछाड करून वीजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

या सर्व वीजचोरांविरुध्द वीजकायदा २००३ च्या कलम १३५ व १३६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून वीजचोरीची व तडजोड रक्कम वसुल करण्यात आली आहे. केल्या गेलेल्या वीजचेारीची व तडजोड रक्क्म न भरणाऱ्या १०८ वीजचोरांविरोधात पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

संध्याकाळी, रात्री मुख्यत्वे आकडा टाकून व मीटर बायपास करुन करण्यात येणाऱ्या वीजचेारीवर करडी नजर ठेवण्यास महावितरणच्या विशेष चमू सर्वत्र कार्यरत आहेत.

चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत चंद्रपूर मंडलाच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे व गडचिरोली मंडलाचे अधिक्षक अभियंता रविंद्र गाडगे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर, वरोरा, बल्लारषा, ब्रम्हपुरी आलापल्ली व गडचिरोली विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वीजचोरी पकडण्याची कारवाई त्यांच्या उपविभागिय व शाखा अभियंता तसेच सहकाऱ्यांसोबत पार पाडली.

वीजचोरी एक सामाजिक अपराध असून वीजचोरी करून कोळस्यासारख्या सिमित संसाधनापासून तयार होणारी वीज चोरून वीजेचा बेकायदा वापर करणारे देशाच्या संपत्तीवरच घाला घालत असतात. त्यामुळे वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे, कायदेशीर मार्गाने वीज वापरण्याचे तसेच वीजबील वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनभरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

हे देखील वाचा: 

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

गडचिरोली कराटेपटू शालेय विभागीय कराटे स्पर्धेत अव्वल

 

Comments are closed.