एकट्या तालुक्यात ५८ एक्कर कपाशी पिकावर फिरवला ट्रॅक्टर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
अमरावती, दि. ०६ नोव्हें.
परतीच्या पावसाने या वर्षी शेतकऱ्याचं कमरड मोडलं आहे.खरीप हंगामात परतीच्या पावसाने हाहाकार केला. त्यामुळे विदर्भात घेतलं जाणार सोयाबीन, कपाशी, मुंग, उडीद पिकाच मोठं नुकसान झालं.सद्या कपाशी पिकावर बोन्ड अळीचा मोठा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांच्या घरात पांढर सोन येईल का हा प्रश्नच शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
बोन्ड अळीला कंटाळून अमरावती जिल्ह्यतील दर्यापूर तालुक्यातील संगलुद शिवारातील १५ शेतकऱ्यांनी ५८ एक्कर कपाशी पिकावर ट्रॅक्टर चालवून कपाशी जमीनदोस्त केली. शेतकऱ्याचं सातत्याने होणार नुकसान पाहता सरकारने शेतकऱ्यांची व्यथा बघता शेतकऱ्यांना सक्षम करणं गरजेचं आहे.सोबतच झालेल्या नुकसान भरपाईची मागणी देखील शेतकऱ्यांनी यावेळी केली.
Comments are closed.