कल्याण मधले अजित कारभारी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोखी मानवंदना
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
कल्याण: ३९५ शिवजयंती निमित्त ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण तालुक्यातल्या कोळीवली गावात राहणारे कुस्तीपटु बळीराम कारभारी यांचे पुत्र अजित कारभारी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांना आगळी वेगळी मानवंदन दिली आहे. त्यांनी ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत यांच्या प्रोहस्ताहनानं
महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील कल्याण तालुक्यातील कोळीवली गावातील कुस्तीपटु कै बळीराम महादू कारभारी यांचा सुपुत्र अजित कारभारी यांनी ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत यांच्या प्रोहस्ताहनानं रशिया मधल्या एरोग्लॅड कोलम्ना इथं सुमारे ३६ अंश सेल्सिअस तापमानात, एल ४१० या हवाई जहाजातून ५ हजार १०० मीटर वर आणि १६ हजार ७७२ फूट उंचीवर, पॅराशूटच्या मदतीनं झेप घेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकवत त्यांना मानवंदना दिली.
असा विक्रम करणारे अजित कारभारी प्रथम भारतीय नागरिक ठरले आहेत. रशियन आर्मी स्कायडाइवचे मुख्य प्रशिक्षक कर्नल कोस्त्या क्रिवोशिव आणि अमेरिकेचे यूनाइटेड स्टेट पैराशूट एसोसिएशनचे स्काईडाइविंग प्रशिक्षक राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अजित कारभारी यांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
Comments are closed.