Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाशिम मधील तरुणाईने केली नववर्षाच्या पहिल्या दिनी महापुरुषाच्या पुतळ्यांची स्वच्छता

वाशिम शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशन, सहयोग फाउंडेशन आणि महिला पतंजली योग समिती वाशिमच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करून तसेच पुतळ्याचे पूजन करण्यात आले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशिम, दि. ०१ जानेवारी: महापुरुषांनी देशासाठी, राज्यासाठी, समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती येणाऱ्या पिढ्याना व्हावी, त्यापासून नागरिकांना प्रेरणा मिळावी म्हणून शहरा-शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांची निर्मिती केली जाते, परंतु पुढे या पुतळ्यांची म्हणावी तशी देखभाल केली जात नाही. प्रशासनाचे आणि नागरिकांचे या पुतळ्यांकडे दुर्लक्ष होते. या पुतळ्यांची आठवण येते ती फक्त त्या त्या महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी दिनी. असे नियमित होऊ नये या उद्देशाने वाशिम शहरात सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशन, सहयोग फाउंडेशन आणि महिला पतंजली योग समिती वाशिमच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करून तसेच पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मध्ये सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रतापजी यांचे तैलचित्र, स्वातंत्र्यसेनानी परळकर, अहिल्यादेवी होळकर,  बाळ ध्रुव, संत  गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले,  श्री.सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आला त्या नंतर पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

Comments are closed.