जिमलगट्टा-देचलीपेठा रस्ताच्या डांबरीकरणास सुरुवात
- पक्क्या रस्त्याची नागरिकांना होती गरज. कमी वेळेत होणार मार्ग सुलभ.
गडचिरोली, दि. २९ डिसेंबर: अहेरी तालुक्यातील दुर्गम मात्र तितकेच महत्वाचे केंद्र असलेल्या जिमलगट्टा या मार्गाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांच्या प्रवास खडतर झाला होता. त्यामुळे पक्क्या रस्त्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून लावून धरण्यात आली होती. दरम्यान प्रशासनाने याची दखल घेत जिमलगट्टा-पेठा या रस्ताच्या डांबरीकरणास सुरुवात केली आहे. यापूर्वी अनेकदा या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र रस्त्याची स्थिती अल्पावधीतच ‘जैसे थे’ होत असल्याने सदर बांधकाम पक्के होईल, अशी आशा परिसरातील नागरिक करत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिमलगट्टा वळण ते देचलीपेठा या पाच किमी च्या रस्ताच्या डांबरीकरणास जोमाने सुरुवात केली आहे यापूर्वी रस्त्याच्या डागडुजीप्रती अनेकदा प्रश्न उपस्थिती केल्या गेल्याने जिमलगट्टा तसेच देचलीपेठा येथील नागरिकांद्वारे या डांबरीकरणाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. संबंधित कंत्राटदारामार्फत रस्त्याचे डांबरीकरण केले जात असले तरी आधीचा अनुभवामध्ये सदर डांबरीकरण किती दिवस टिकेल, डांबरीकरण योग्यप्रकारे होत आहे का? अशा प्रश्नांना परिसरात पेव फुटले आहे. यापूर्वीही पावसाळ्याच्या काही कालावधीपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र काही दिवसातच हा रस्ता उखडून मोठ मोठे खड्डे पडले होते. अवघ्या २-३ महिन्याच्या कालावधीत या रस्त्याची स्थिती दयनीय बनल्याने कामाच्या योग्यतेबाबत जनतेकडून प्रश्न उपस्थित केले गेले.
पक्के रस्ते हा कोणत्याही भागाच्या विकासासाठी महत्वाचा दुवा मानला जातो. त्यामुळे रस्ते, विद्युत, शाळा, दवाखाना हे प्रमुख गावाच्या उन्नतीसाठी साधन ठरते. त्यामुळे सदर पाया दर्जेदार असल्यास गावाची योग्य विकासाकडे वाटचाल होते. त्यामुळे सद्यस्थितीत रस्त्याचे सुरु असलेले काम उत्कृष्ट दर्जाचे होणे गरजेचे ठरते. सदर कामाच्या दर्जा ८ ते १० वर्ष टिकावे असे काम करणे अगत्याचे आहे. उगाच थातूरमाथुर काम करू नये. अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. त्यामुळे या ५ किमी चा नवनिर्मित बांधकामामुळे जनतेमध्ये आनंद व्यक्त होत असला तरी रस्त्याच्या दर्जाकडे त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
Comments are closed.