Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आंबोली व किष्टापूर येथे अपमानास्पद लिखाण प्रकरणी आरोपीस अटक..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आष्टी 26: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी समाजमाध्यमांवर अपमानास्पद आणि विखारी लिखाण केल्याच्या प्रकरणी अभिजित मोरेश्वर मोहुर्ले, वय 37 वर्षे, रा. सोमनपल्ली यास आष्टी पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीस न्यायालयात हजर करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध कलम 299 BNS तसेच अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यानुसार कलम 3(1)(v), 3(1)(u) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे, प्राणहिता अहेरी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही कारवाई बौद्ध अस्मिता रक्षण समिती, येणापूर परिसरातील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शक्य झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत समितीचे अध्यक्ष काजल मेश्राम यांनी आष्टी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल काळे व त्यांच्या संपूर्ण पोलिस दलाचे विशेष आभार मानले आहेत.

तसेच, समितीचे पदाधिकारी, सदस्य, आणि येणापूर परिसरातील सर्व बौद्ध समाजबांधव यांनी दाखवलेल्या एकजुटीबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या घटनेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानकारक वर्तन करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर पावले उचलली जातील असा विश्वास जनतेत निर्माण झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.