Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या युवकावर काळाचा घाला.

उच्चशिक्षित युवकाच्या अकाली मृत्यूने गडचिरोलीमध्ये हळहळ...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गड़चिरोली दि,१९ जुलै : मित्राचा वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील शेवटचा आनंदाचा क्षण असेल याची त्या उचाशिक्षित तरुणाला पुसटशी देखील कल्पना नसेल. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान नागपूर येथील हिंगणा टी पॉईंट च्या विरूद्ध दिशेला असलेल्या मेट्रो स्टेशन लगत घटना घडली. मिहीर भास्कर मेश्राम (२०) असे या दुर्दैवी युवकाचे नाव असून तो मूळचा गडचिरोली येथील आहे.

मिहीर मेश्राम हा नागपूर येथील प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता. सोमवारी रात्री आपल्या मित्राच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना नागपूर येथील हिंगणा टी पॉईंटच्या मेट्रो स्टेशन लगत मेट्रो कंपनीचाच रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला त्याच्या दुचाकीची जबर धडक बसली. पाऊस आणि अंधारामुळे रस्त्याच्या मध्ये बंद असलेल्या ट्रकचा मिहीरला अंदाज न आल्याने जोरदार धडकेने झालेल्या अपघातात मीरचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकाने ट्रक मेट्रो रोडच्या साईडला ठेवला असता तर कदाचित हा अपघात झाला नसता असं परिवाराचे म्हणणे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मीरचे वडील हे गडचिरोली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गट निदेशक म्हणून कार्यरत आहेत.या शिवाय त्यांचे सामाजिक क्षेत्रात ही मोठे योगदान आहे. त्यांचा सामाजिक वर्तुळात मोठा परिचय आहे. तर आई नगरपरिषद येथील शाळेत शिक्षिका आहेत. तसेच मिरच्या एका बहिणीचे नुकतेच वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे.

नागपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच  मोका पंचनामा करून मृतक मिहीरच्या आई-वडिलांना माहिती देत नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे शवविच्छेदन करून मृतदेह गडचिरोली येथे पाठवण्यात आला आहे. त्याच्या अश्या अकाली जाण्याने परिसरासह जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.