Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पर्लकोटा नदीवरील नवीन पुलाच्या कामाला झाली सुरुवात

  • भामरागड तालुक्यातील जनतेची प्रतीक्षा लवकरच संपणार.
  • तहसीलदार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कामाला झाली सुरुवात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भामरागड, दि. ५ जानेवारी: भामरागडला लागून असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला आज पासून सुरवात होत आहे, त्यामुळे लवकरच भामरागड तालुक्यातील जनतेची अनेक वर्षांपासून ची पुलाची प्रतीक्षा संपणार असून पर्लकोटा नदीवर नवीन पूल निर्माण होणार असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुरामुळे होणारे जनतेच्या समस्यांना पूर्णविराम मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होताना पहावयास मिळत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अनेक वर्षापासून पर्लकोटा नदीला महापूर यायचा त्यामुळे भामरागड ते आलापल्ली हा मार्ग बंद पडत होता. परिणामी भामरागड तालुक्यातील जनतेचा जगाशी संपर्क तुटायचा नवीन पूल पूर्णत्वास आल्यानंतर ही समस्या कायमची संपणार आहे. मात्र या पर्लकोटा वरील नवीन पूल व्हावा या करीता भामरागड तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते तसेच व्यापारी संघटना, विशेष म्हणजे तालुक्यातील पत्रकार संघटनेनी अथक परिश्रम घेत शासन दरबारी अनेक वर्षांपासून मागणी लावून धरली त्यामुळे आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यामुळे तालुक्यातील जनतेचा आनंद गगनात मावेनासे झाल्याचे चित्र दिसत आहे.

हा भूमीपूजन सोहळा तहसीलदार अनमोल कांबळे यांचे हस्ते पार पडला असून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिश्वास, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बडगे, आदिवासी सेवक सब्बर बेग मोगल आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून लवकरच दोन वर्षांच्या आत नवीन पूल पहावयास मिळणार आहे.

Comments are closed.