Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून 2 वर्षांची शिक्षा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 नाशिक :- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.

1995 ते 1997 दरम्यान सरकारच्या 10 टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. यात त्यांनी माणिकराव कोकाटे यांंच्यावर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनुसार भादवी 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.