अहेरी पोलिसांनी मोठी कारवाही 9 लाख 35 हजारांची दारु जप्त
बैल पोळा, तान्हा पोळा असतांना अवैधरीत्या दारु वाहतुक करणारे तिघांवर गुन्हे दाखल
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी, 03 सप्टेंबर – बैल पोळा, तान्हा पोळा सण शांततेत पार पडावे यासाठी अहेरी पोलिस पेट्रोलींग करीत असतांना मौजा कोलपल्ली येथे गोपनिय माहितीवरुन त्यांचे राहत्या घरी धाड टाकून देशी विदेशी दारुसह एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मध्ये तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
आरोपी देवाजी निला सिडाम, वय 34 वर्षे, दिलीप रामा पोरतेट, वय 28 वर्षे, संपत पोच्चा आईलवार, वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तालुका अहेरी येथील असे आरोपीचे नावे आहे. पोळा व गणेशोत्सव सण शांततेत पार पाडुन उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये या करिता उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या नेत्त्वात धाड टाकली त्या मध्ये, देशी विदेशी दारुसह एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यामध्ये, रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या 90 मिली मापाच्या एकुण 10,000 सिलबंद निपा किंमत 8,00,000/- रुपये, किंगफिशर स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या एकुण 80 नग बॉटल किंमत 24,000/- रुपये, हेवड्र्स 5000 स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या 230 नग सिलबंद बॉटल किंमत 57,500/- रुपये, ऑफिसर चॉईस कंपनीच्या 1000 मिली मापाच्या 54 नग सिलबंद बंपर किंमत 54,000/- रुपये असा एकुण 9,35,500/- मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला अजून त्यावर 258/2024 कलम 65 (ई), 83 महा. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी स्वप्नील ईज्जपवार यांचे नेतृत्वात, मंगेश वळवी, सागर माने, अतुल तराळे, निलकंठ पेंदाम, हेमराज वाघाडे, शंकर दहीफळे, राणी कुसनाके, दादाराव सिडाम यांनी पार पाडली.