Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यावर तिरुपती मडावी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे

अजय कंकडालवार यांची अनु.जमातीसाठी नेहमीच धडपड : माजी जि.प.सदस्य अजय नैताम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ८ सप्टेंबर: गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अहेरी विधानसभा क्षेत्रात जास्तीत जास्त जागा अनु.जमाती साठी राखीव ठेवल्याने माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आक्षेप नोंदविल्याने आदिवासींचे आरक्षण कमी झाले असा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य तिरुपती मडावी यांनी करत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली होती. हे आरोप पूर्णतः बिनबुडाचे असून अजय कंकडालवार यांची अनु.जमातीसाठी नेहमीच धडपड असते, आदिवासी समाजाप्रती त्यांची एकनिष्ठता असून नेहमी आदिवासींच्या मदतीकरिता धावून येणारे नेते आहेत असे मत माजी जि.प.सदस्य अजय नैताम यांनी व्यक्त करीत तिरुपती मडावी यांच्या आरोपाचे खंडन केले आहे. 

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरिता जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणात अहेरी विधानसभा क्षेत्रात जास्तीत जास्त जागा अनु.जमाती साठी राखीव ठेवण्यात आल्याने आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे आदिवासींचे आरक्षण कमी झाले असा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य तिरुपती मडावी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला होता. मात्र आता माजी जि. सदस्य अजय नैताम यांनी या आरोपाचे खंडन केलेआहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार हे अनु.जमातीचे नाहीत मात्र आदिवासी समाजाबाबत जाणीव असून समाजाच्या प्रत्येकाच्या लग्न सोहळा, तेरावी कार्यक्रम, दवाखान्याच्या खर्च असो व समाजातील कोणत्याही सण उत्सव असो व समाजाच्या थोर पुरुषांचे पुतळा उभारण्यासाठी तसेच सल्ला गंगारा प्रतिक बनवण्यासाठी गोटूल समाज मंदिर, माता मंदिर असे अनेक सामाजिक कामांकरिता त्यांनी स्वतःकडुन आर्थिक मदत केली आहे तसेच समाजावर अन्याय अत्याचार झाल्यास आवाज उठवण्यासाठी तत्पर असतात. मात्र तिरुपती मडावी ज्याच्या नेत्रुत्वात एक कार्यकर्ता म्हणून कार्य करतो त्यांचे या समाजासाठी काय योगदान आहे ? गेल्या चाळीस-पन्नास वर्षापासून अनुसूचित जमाती साठी राखीव असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजातील राजघराण्यात आमदार, मंत्री झाले आहेत त्यांनी अनुसूचित जमाती साठी काय केले ? असा सवालही अजय नैताम यांनी केला आहे.

अजय कंकडालवार हे आदिवासी नाहीत मात्र त्यांना आदिवासी संस्कृती, बोली भाषा, राहणीमान, खान-पान अवगत असून समाजासोबत एकनिष्ठेने आणि आदराने वागत असतात. राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व देत असतात त्यामुळे अजय कंकडालवार अहेरी विधानसभा क्षेत्राच्या कुठल्याही खुल्या जागेवरून जिल्हा परिषद साठी निवडुन येतात हे नक्की असे उत्तरही माजी जि.प.सदस्य अजय नैताम यांनी तिरुपती मडावी यांच्या आरोपाचे खंडन करतांना दिले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

सुरजागड लोहप्रकल्पाच्या जडवाहतुकीने रस्त्यासह नागरिकांचे मोडले कंबर्डे..

सामान्य नागरिक केंद्र बिंदू ठेवून प्रशासनाचे व्हावे सुशासन…!

 

 

Comments are closed.