Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकरी आंदोलनाला नागपुरात सर्वपक्षीय प्रतिसाद.

Get real time updates directly on you device, subscribe now.

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नागपूर, दि. १४ डिसेंबर :

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१८ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात लढा उभारला आहे. त्याच्या समर्थनार्थ आज सोमवार १४ डिसेंबर रोजी शेतकNयांनी अन्नत्याग आंदोलनाची हाक दिली होती. नागपूरमध्ये शेतकऱ्याना पाठींबा देत विविध पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन संविधान चौकात धरणे दिले.

दिल्लीतील शेतकऱ्यांनी सोमवारी अन्नत्याग व देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागपुरातही प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिन्ही कृषी कायदे शेतकरी विरोधी असून ते रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या अंतर्गत सोमवारी दुपारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये म. रा. किसान सभेचे अरुण वणकर, आपचे जगजितसिंह, जनता दल सेक्युलरचे रमेश शर्मा, रिपाइंचे प्रकाश कुंभे, फारवर्ड ब्लॉकचे यशवंत चितळे, आयटकचे शाम काळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. रमेश पिसे, राहुल वानखेडे, राहुल दहीकर, टीयुसीसीचे मारोती वानखेडे, एसएससीईबी वर्कर्स फेडरेशनचे चंद्रशेखर मौर्य, एसयुसीआयचे माधव भोंडे, भारतीय महिला फेडरेशनच्या चंदा अपराजीत, दिलीप तायडे, दक्षिणायनचे अमिताभ पावडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुधाकर वाघुळे, महाराष्ट्र किसान सभेचे मधुकर मानकर, शिक्षण हक्क परिषदेच्या सुषमा रामटेके, आंगणवाड़ी युनियनच्या ज्योती अंडरसहारे, एआयएसएफचे आशीष बनकर, शेतमजूर युनियनचे मनोहर मुळे, सिटूचे मधुकर भरणे, ए.के. घोष, वि. रा. साथीदार, संजय हेडाऊ, मीना देशपाडे, बंडू मेश्राम, राष्ट्रीय ओ बी सी महासंघाच्या वंदना वनकर, रिपाइ सेक्युलरचे दिनेश अंडरसहारे यांच्यासह दिनेश बन्सोड, सुदर्शन मून, प्रवीण कांबळे आदींसह सहभागी झाले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.