अंबरनाथच्या प्राचीन एक हजार वर्षांच्या वारशाला मिळणार नवी झळाळी.
शिवमंदिर सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून ४३ कोटींचा निधी मंजूर.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ठाणे, दि. ५ डिसेंबर: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी आज 43 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. शिवमंदिराचा विकास आराखडा मंजूर करून घेण्यापासून ते निधी मिळवण्यापर्यंत घेतलेल्या सर्व परिश्रमाला आज यश आल्याबद्दल डॉ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
दरम्यान, अंबरनाथ शिवमंदिराचा विकास 2 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपये खर्च होणार असून दुसऱ्या टप्प्यात 23 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
टप्पात आरक्षण क्रमांक 171 मधील जागेत प्रवेशद्वार व कमान उभारण्यात येणार आहे. तसेच बस स्टॉप विकसित करण्यात येणार असून जंतर-मंतर पार्क व दर्शनी भागाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याच ठिकाणी भव्य अशा पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी सुरुवातीला नऊ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
यामध्ये दुसऱ्या भागात वालधुनी नदीचे संवर्धन करण्यात येणार आहे. तसेच अंबरनाथ शहराच्या बाजूने मंदिराकडे जाणारे व येणारे दोन नवीन टेनसाईल सस्पेंडेड ब्रिज उभारण्यात येणार आहेत. यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे
Comments are closed.