Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन, शिक्षण क्षेत्रात शोककळा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

अमरावती, दि. २८ जानेवारी: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे आज सकाळी पुणे येथील खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते 56 वर्षाचे होते.

डॉ. दिलीप मालखेडे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक होतें. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डॉ. मालखेडे हे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार -१ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत होते. मालखेडे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेतून पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे (एमई) शिक्षण घेतले.
मुंबई आयआयटी मधून त्यांनी संशोधन कार्य करीत पीएचडी प्राप्त केली होती. मालखेडे यांना तीन दशकाहून अधिक शैक्षणिक आणि तीन वर्ष उद्योग क्षेत्रात कार्याचा अनुभव होता.

कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांनी आपल्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठे यांच्यासोबत करार केला होता. नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकता यावे याकरिता त्यांनी अमरावती विद्यापीठात क्रेडिट बेस्ट चॉईस सिस्टीम सुद्धा लागू केली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यांच्या दुःखद निधनाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. कुलगुरू म्हणून रुजू झाल्यानंतर विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी जो पुढाकार घेतला आणि अमरावती विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याकरिता जी धोरणे आखलीत, ती सर्वांकरिता दिशादर्शक ठरली आहेत. त्यांच्या दुःखद निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : 

सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा समिती गठीत करण्याबाबत

शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना

 

 

Comments are closed.