Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माझ्या आयुष्यात पहिलेला सर्वात मोठा स्वयंस्फुर्त अभिनव स्वातंत्र्योत्सव – अमृता फडणवी

श्रमजीवीचा डोळे दिपवणारा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव गणेशपुरीत साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भिवंडी/ दि.१५ ऑगस्ट :-  भारतीय स्वातंत्र्याचा या अमृतमहोत्सवी वर्षात डोळे दिपवून टाकणार स्वातंत्र्योत्सव भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी या ठिकाणी पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या. सर्वासामान्य, गरीब, मजूर, कष्टकरणारी बांधवांचा हा उत्साह गौरवास्पद आहे, एवढ्या मोठ्या संख्येने आलेले श्रमजीवी बांधव आणि त्यांची एकजुटीची शक्ती असाधारण आहे, मी पाहिलेला हा पहिला आणि सर्वात मोठ स्वयंस्फुर्त अभिनव स्वातंत्र्योत्सव असल्याचे गौरवोदगार यावेळी अमृता फडणवीस यांनी काढले.

श्रमजीवी संघटनेच्या वतीने गेली चार दशकं हा स्वातंत्र्याचा उत्सव नियमितपणे होत असतो. ज्या कष्टकरीआदिवासी बांधवांना स्वातंत्र्याची फळे अद्यापही चाखायला मिळाली नाही ते कोणतीही खंत न बाळगता आपल्या देशाप्रती निस्सीम अभिमान बाळगत, स्वातंत्र्यविरानी दिलेल्या बलिदान आणि त्यागासाठी कृतज्ञता व्यक्त करत या उत्सवात सहभागी झाले होते. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, मुंबई आणि अहमदनगर जिल्ह्यातून २० हजारा पेक्षा जास्त बांधव स्व खर्चाने या उत्सवात सहभागी झाले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वज्रेश्वरी येथून मिरवणूकीने हे हजारो श्रमजीवी बांधव नाचत गाजत स्वातंत्र्याचा जयघोष करत, पारंपरिक नाच घेऊन देशाच्या तिरंगायला सलामी देण्यासाठी गणेशपुरी या ठिकाणी पोहचले. कार्यक्रम इतका देखणा होता कि लय आणि शिस्तबद्ध पद्धतीने लेझिम खेळणाऱ्या मुलींसोबत नाचण्याचा अमृता फडणवीस यांनीही आपला मोह आवरता आला नाही, आणि त्या लेझिम हातात घेऊन मुलींमध्ये सहभागी झाल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्त्यांनी गांधीजी, भगत सिंग, राजगुरू, राघोजी भांगरा, नाग्या कातकरी असो वा सुभाषचंद्र बोस,स्वातंत्र्यवीर सावरकर आशा क्रांतिकाराजांच्या प्रतिमा घेऊन आणि तिरंगा हातात तिरंगा ध्वज घेऊन अगदी शिस्तीत सहभागी झाले होते.
यावेळी संस्थापक आणि राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा ) विवेक पंडित यांनी “श्रमजीवी संघटना स्वातंत्र्याची किरणं आदिवासी गरीब दुर्बल बांधवांच्या घरात, झोपडीत पोहचावी म्हणून लढत असलेल्याचे” सांगितले.

 

या अद्भुत आशा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी अमृता देवेंद्र फडणवीस, श्रमजीवी संघटनेच्या आणि विधायक संसद च्या संस्थापिका विद्युलता पंडित,संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा विवेक पंडित, संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा कार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित, उपाध्यक्ष केशव नानकर, अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र आगरकर, उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर सरचिटणीस बाळाराम भोईर विजय जाधव यांच्यासह ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे,पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, यांच्यासह सर्व राज्य,जिल्हा,तालुका,झोन आणि गावकमेटी पदाधिकारी या सोहळ्याला सहभागी झाले होते.
सायबर तज्ञ आणि नायरा फाऊंडेशचे रोहन गायकवाड, डॉ. आशिष भोसले,नवीन दुबे इत्यादी मान्यवर उपस्थिती होते.
वज्रेश्वरी ते गणेशपुरी येथून निघालेल्या भव्य मिरवणुकीत संघटनेच्या तरुणांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली,पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गावडे, संजीव साखरे, दोंदे, राऊत यांच्यासह सर्व पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्ताचे काम पाहिले.

हे देखील वाचा :- 

Comments are closed.