एक एकर गुलाब फुलशेतीतुन वर्षाला घेत आहेत साडे सहा लाखाचे उत्पन्न.
मनरेगा ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन घोटा येथील विठ्ठल तांदळे यांनी फुलवीली गुलाब शेती.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 23 जून – शेतीमध्ये काळाच्या स्थित्यंतराप्रमाणे बदल करणे आता गरजेचे असून नेमकी हीच बाब वाशीम जिल्ह्यातील युवा घोटा येथील युवा शेतकरी विठ्ठल तांदळे यांनी हेरून कमी क्षेत्रात आर्थिक उन्नती साधली आहे. घोटा येथील विठ्ठल तांदळे यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाले महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेचा लाभ घेत गुलाब शेती फुलवीली असून बारमाही मागणी असणाऱ्या गुलाब फुलांच्या विक्रीतुन त्यांनी अल्प क्षेत्रात स्वतःबरोबर कुटुंबाचीही आर्थिक उन्नती साधली आहे.
अलीकडील काळात सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाचा शेती व्यवसायात शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे पारंपारिक शेतीतुन फारसे उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. घोटा येथील युवा शेतकरी विठ्ठल तांदळे यांनी सहाय्यक कृषी अधिकारी अनिल जयताडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन पुणे येथून गुलाब रोप आणले. दोन वर्षापूर्वी लागवड केलेले गुलाब आता बहरत असून लग्न सराईबरोबरच ईतर हंगामातही वाशीमसह हिंगोली जिल्ह्यातुन त्यांच्या गुलाबाला मागणी आहे. फुलशेतीच्या यशस्वी प्रयोगातुन तांदळे यांना केवळ एक एकर शेतात वर्षाला ५ ते ६ लाखांचे उत्पन्न होत आहे.
सुरुवातीला फुलशेतीचा प्रयोग तांदळे त्यांच्यासाठी नवखा होता. अशा परिस्थितीत फुलशेती यशस्वी करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक काम होतं. मात्र त्यांनी हे आव्हान पेलून दुष्काळी पट्ट्यात फुलशेतीत यशस्वी करून आपल्या प्रयोगाचे वेगळेपण जपल आहे. ईतर शेतकऱ्यांनी देखील कृषी क्षेत्राशी निगडित शासनाच्या विवीध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी अनिल जयतायडे यांनी केले आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.