Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कृषी कायद्यांविरोधात अण्णा हजारे करणार आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहमदनगर डेस्क 27 डिसेंबर:- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अण्णा हजारे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणार आहेत. यासाठी त्यांनी दिल्ली येथील रामलीला किंवा जंतर-मंतर मैदानात आंदोलनासाठी परवानगी देखील मागितली आहे.

अण्णा हजारे यांनी आपलं शेवटचं आंदोलन हे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल असंही म्हटलं आहे. याआधी शेतकरी आंदोलनावर अण्णा हजारे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. याआधी भाजपचे नेते हरिभाऊ बागडे आणि नंतर खुद्द गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली होती. तसेच अण्णांनी शेतकरी आंदोलनात भाग घेऊ नये म्हणून प्रयत्न केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही अण्णा असं काही आंदोलन करणार नाहीत असं म्हटलं होते. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी घेतलेला आंदोलनाचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.