पोलीस स्टेशनमध्ये महिलेचा विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न
चंद्रपूर, दि. ९ जानेवारी: चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती पोलीस स्टेशन मधील काल संध्याकाळची ही घटना घडली असून परवीन गोतमवाड असं 26 वर्षीय आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे. ही महिला शेनगाव येथे राहत असून तिच्या घरा शेजारी असलेली महिला हिच्यासोबत काही किरकोळ वादावरून नेहमी भांडण करायची त्यामुळे परवीन गोतमवाड कंटाळून गेली होती. काल दि. ०८ जानेवारी रोजी तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती.
त्यामुळे या प्रकरणाची तक्रार देण्याकरिता ती महिला आपल्या पतीसोबत नजीकच्या जिवती पोलीस स्टेशन मध्ये गेली होती. परंतु तिचा मनातला राग शांत झाला नव्हता व नेहमीच्या वादाला पूर्णविराम देण्याकरिता तिने पोलीसासमोरच स्वतः जवळ असलेली उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थानांतर करण्यात आले. सध्या या महिलेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.
या संदर्भात अधिक तपास सुरु आहे व या घटनेची चौकशी जिवती पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक एस. आर. अंबिके करीत आहे. अशी माहिती गडचांदूरचे उप विभागीय पोलीस अधिकारी, सुनील कुमार नायक यांनी दिली आहे.
Comments are closed.