Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरमोरीत सायबर गुन्हे विषयाच्या पथनाट्याद्वारे करण्यात आली जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि. ४ जानेवारी: गडचिरोली जिल्ह्यात मोबाईल द्वारे सायबरची वाढती गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता आरमोरी येथील नवीन बस स्टँड येथे आज दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी सायबर गुन्हे रोखण्यासाठी कला पथकाचे आयोजन करण्यात आले होते या कलापथकाद्वारे सायबर गुन्हे घडू नये या विषयी जनजागृती करण्यात आली.          

सविस्तर वृत्त असे की गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय गोयल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यावर सायबर द्वारे होणारे विविध गुन्हे आणि या गुन्ह्याच्या माध्यमातून लोकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी जनतेला सायबर गुन्हे कशा पद्धतीने होत आहेत आणि त्या माध्यमातून अनेकांचे जीवन कसे उद्ध्वस्त होतात त्यामुळे आर्थिकतेचा फटका सुद्धा या सायबर च्या माध्यमातून जनतेला कसा घडते? यासाठी जिल्हा मुख्यालयाच्या माध्यमातून सायबर गुन्हे विषयी जनजागृती पथनाट्य च्या माध्यमातून आणि कलापथकाच्या माध्यमातून आरमोरी येथील नवीन बस स्टँड येथे जनजागृती करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर जनजागृती करण्यासाठी आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यावरून आलेली टीम यांनी उत्कृष्टरीत्या हा जनजागृतीचा कार्यक्रम सादर केला. या सादरीकरण्याच्या निमित्ताने त्यांना सहकार्य करण्यासाठी आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अकबर शहा पोयाम, गोदोळे आणि इतरही कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या कलापथकाचा लाभ जास्तीत जास्त आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच कला कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी किसनराव खोब्रागडे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी, हितकारिणी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच आंबेडकर हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे या कलापथकाचा लाभ घेतला.

कलापथकाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यातून मोबाईल द्वारे एकमेकांना पैसे पाठवणे मोबाईल द्वारे फेक न्यूज पाठवणे मोबाईल द्वारे एटीएम चे पिनकोड विचारणे मोबाईलद्वारे एकमेकांची फसवणूक करणे आणि त्यावर उपाययोजना कशा कशा पद्धतीच्या करण्यात येतात याविषयी उत्कृष्ट असे चालतेबोलते चित्र या कलापथकाच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच जनतेसमोर या टीमने सादर केले. त्यामुळे बऱ्याच पद्धतीची जनजागृती या कलापथकाद्वारे करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.