मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गुंडाळण्याचा पाप करू नका
माजी मंत्री लोणीकर यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांना मागणी
जालना, दि. २४ डिसेंबर: मराठवाडयावरील सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाचं कलंक पुसण्यासाठी भाजप सरकारने मंजूर केलेल्या महत्वकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गुंडाळून विद्यमान महाविकास आघाडी सरकारने मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय केलाय.
मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या जिवणात पिण्याच्या पाण्याचे आठराविश्व दारिद्रय दुर व्हावे आणि सर्वांना मुबलक पाणी मिळावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणविस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून तत्कालीन सरकारने मराठवाडा वॉटर ग्रिड योजणा मंजूर केली होती या योजनेमुळे मराठवाड्यातील उद्योगाला शेतीला आणि सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार होती. दरम्यान, विद्यमान महाविकास आघाडी सरकारने राजकारण करत तपासणीच्या नावाखाली एक वर्ष ही योजना रेंगाळत ठेवली आणि आता योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहून हे पाप न करण्याची मागणी केल्याचं आमदार बबनराव लोणीकर म्हणालेत.
Comments are closed.