चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून बाळ चोरी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 20 जून – चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून बाळ चोरीची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.आज सकाळी सहा वाजता वार्ड क्रमांक 15 मधून अनोळखी महिलेने बाळासह रुग्णालयाबाहेर केले पलायन, काही मिनिटांआधीच बाळाच्या मातेने शिशु अतिदक्षता कक्षात बाळाला करविले होते स्तनपान, त्यानंतर काही मिनिटातच एक अनोळखी स्त्री बाळाला घेऊन रुग्णालयाबाहेर गेल्याचे सीसीटीव्ही यंत्रणेतून झाले.
या धक्कादायक घटनेनंतर रुग्णालय प्रशासन व पोलिसांनी तातडीने बैठक घेत याविषयी सुरू केली चौकशी, प्राथमिक चौकशीत आरोपी महिलेचे निष्पन्न झाले असून विविध पोलीस पथके बाळ व आरोपी महिलेच्या शोधासाठी केली गेली आहेत रवाना, बाळ चोरीमागे नक्की कोणता उद्देश आहे याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.
हे पण वाचा :-
Comments are closed.