Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोघाआरोपींना नऊ लाखाच्या मुद्देमालसह भिवंडी पोलिसांनी केली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भिवंडी, 18 नोव्हेंबर :- भिवंडी तालुक्यातील दापोडा रोड वळगांव या ठिकाणी चहा नाष्टा करण्यासाठी वाहन चालक आपला मालवाहू टेंपो रस्त्यावर उभा करून गेला असता अज्ञात चोरट्यानी 11 लाख रुपये किमंतीचा टेम्पो मालासह घेऊन पळून गेले होते. याबाबत घाबरलेल्या चालकाने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल केला व याबाबत तपास सुरू करून अवघ्या 24 तासात मिळालेल्या माहितीवरून दोघा आरोपींना शिताफीने अटक करून 9 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस उपाआयुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी दिली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी कि, ब्रजेशकुमार सिंह यांचा टेम्पो चालक राजकुमार यादव हा टाटा टेंपो क्रमांक MH 04 DK 7753 मध्ये 11 लाख 88 हजार 114 रुपयांचे कापडाचे रोल घेऊन गोदामा कडे जात असताना दुपारी टेम्पो चालक यादव दापोडारोड, वळगांव या ठिकाणी चहा नाष्टा यासाठी हाँटेल जवळ थांबला असता अज्ञात चोरट्याने टेम्पो मालासह घेऊन पळून गेले. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात सिंह यांनी तक्रार दाखल केली त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्हयाची उकल करण्यासाठी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार, सहा.पोलीस उप निरीक्षक डी.डी.पाटील, बी एस. नवले, पोलीस कर्मचारी बी बी चव्हाण, हरेश म्हात्रे, लक्ष्मण सहारे, सुनिल शिंदे, योगेश क्षिरसागर, मयुर शिरसाट, विजय ताठे यांचे विशेष पोलीस पथक नेमून मिळालेली व तांत्रिक माहितीच्या आधार घेत माग काढून अवघ्या 24 तासात अमरदीप चंद्रकांत जयस्वाल (वय 35, रा.कल्याण ) व जुबेर अ. मजिदअली खान,(वय 35, रा.वडाळा, ) मुंबई.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशा दोघा आरोपींना मोठ्या शिताफीने पहाटे ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्या ताब्यातून गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी 9 लाख 49 हजार 167 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मदन बलाळ यांनी दिली. पोलिसांनी दाखल गंभीर गुन्ह्यात अवघ्या 24 तासात आरोपींना गजाआड करून मुद्देमाल हस्तगत केल्याने ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ठाण्यातील नौपाडा परिसरातील इमारतीला भीषण आग

 

Comments are closed.