Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गौशाळा, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, महिला गृहउद्योगाकरिता उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन पडले पार

माँ विश्वभारती सेवा संस्थेचा पुढाकार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आलापल्ली, दि. २७ डिसेंबर : स्व.ईश्वर भंडारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीमती देवी भंडारी यांनी माँ विश्वभारती सेवा संस्था आलापल्ली यांना दान केलेल्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या गौशाळा, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, महिला गृहउद्योग साठीच्या इमारतीचे आज भूमिपूजन पार पडले.

आज समाजात दातृत्वाची भावना कमी होत असताना सेवाभावी संस्थेसाठी आपली स्वमालकीची जमीन दान देऊन भंडारी परिवाराने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. त्यांचे हे कार्य नक्कीच स्पृहणीय असून समाजातील दानकर्त्यांनी समोर येऊन माँ विश्वभारती सेवाभावी संस्थेच्या कार्यात हातभार लावण्याचे आवाहन आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

 

यावेळी आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, तर प्रमुख अतिथी म्हणून आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया, अहेरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे,आलापल्ली चे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, देवी भंडारी, नागेपल्ली चे सरपंच लक्ष्मण कोडापे, आलापल्ली चे उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार, नागेपल्ली चे उपसरपंच रमेश शानगोंडावार, डॉ. चिमरालवार पेसा कमिटी अध्यक्ष स्वामी वेलादी आदींची उपस्थिती होती.

 

यावेळी माँ विश्वभारती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे या सामाजिक कार्यासाठी भूमीदान देणाऱ्या  देवी भंडारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे यांनी संस्थेच्या कोरोना काळात केलेल्या सेवाकार्याची माहिती व उभारण्यात येणाऱ्या गौशाळा, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, महिला गृहउद्योगाची माहिती उपस्थित लोकांना दिली.

यावेळी विजया विठ्ठलाणी यांनीही उपस्थिताना संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुधाकर मददेर्लावार यांनी केले. या कार्यक्रमाला व्यापारी वर्ग, गनमान्य नागरिक आणि महिला वर्गाची उपस्थिती होती.

 

हे देखील वाचा : 

मोठी बातमी : पोलीस जवान आणि नक्षल्यांत चकमक; चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा

 

ज्येष्ठ कवी, लेखक, संगीतकार विनयकदादा पाठारे काळाच्या पडद्याआड…

गावात शिरून बिबट्याने केली गायीची शिकार; गावकऱ्यामध्ये दहशत

Comments are closed.