Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: चंद्रपुर जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राला भीषण आग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपुर, दि. २५ फेब्रुवारी: चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केन्द्राच्या इमारतीला अचानक भीषण आग लागली. ही आग कशाने लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अचानक लागलेल्या आगीमुळे बांबू केंद्राचे खूप मोठे नुकसान झाले असून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हि इमारत पूर्ण बांबू पासून तयार केलेली आहे. अचानक आग लागल्याने एकच खड़बड उडाली आहे. अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या या प्रोजेक्ट मधे शेकडो लोकांना रोजगार मिळणार होता पण उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रोजेक्ट ला आग लागल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान तर झालेच पण यावर शेकडो लोकांचा रोजगार गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

माजी वित्त मंत्री व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ही इमारत बांधन्यात आली होती. बांबू प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 91 कोटी चा खर्च अपेक्षित होता. आसाम, कोलकत्ता, सिंधुदुर्ग येथून आणलेल्या विविध प्रकारच्या बांबू पासून ही भव्य दिव्य इमारत बांधण्यात आली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

2017 मध्ये या इमारतीच काम सुरु झाला होत, ही इमारत आशिया खंडातील बाबूं पासून तयार होणारी सर्वात मोठी इमारत असल्याची माहिती आहे. इमारतीचे सध्या काम सुरु होते, इमारतीच उद्धघाटन ही बाकी होते.

Comments are closed.