मोठी बातमी: सिरम इन्स्टिट्यूट मधील आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू – महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुपुणे डेस्क, दि. २१ जानेवारी: पुणे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मांजरी येथील प्लांटमध्ये आज दुपारी भीषण आग लागली या आगीमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती पुण्याचे महापौरमुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या आगीमध्ये कोट्यावधी ते नुकसानही झाले असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. गुरुवारी दुपारी सिरमच्या निर्माणाधीन इमारतीच्या तळमजल्याला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ते काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या दरम्यान आग लागलेल्या इमारतीतून चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आग विजवल्यानंतर इमारतीमध्ये पाच जणांचे मृत्यू मृतदेह आढळून आले. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
तसेच ज्या पाच लोकांचे मृतदेह सापडले ती सर्व निर्माणाधीन इमारतीत काम करणारे मजूर असावेत अशी शक्यता आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही परंतु इमारतीमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असतांना उडालेल्या ठिणगीमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
Comments are closed.