लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : दि. १४ डिसेंबर रोजी अहेरीहून गडचिरोलीकडे जाणारे पोलिसांच्या ताफ्यातील भूसुरुंगविरोधी वाहन (एमपीव्ही- ०२८५) जात असताना चौडमपल्लीजवळ भूसुरुंगविरोधरी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली असून त्यात एक युवक ठार झाला.
चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्लीजवळ भूसुरुंगविरोधक वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात गणेश बाजीराव मडावी हा जागीच ठार झाला, तर रवी मडावी गंभीर जखमी झाला, सदरची घटना १३ डिसेंबरला दुपारी अडीच वाजता घडली.
गणेश बाजीराव मडावी वय ३३ वर्ष रा. लगाम ता. चामोर्शी असे मृत तरुणाचे नाव आहे. तर रवी हनमंतु मडावी वय ३८ वर्ष रा. लगाम हा जखमी आहे. ते दोघेही एमएच ३३ एक्स ३३०७ या क्रमांकाच्या दुचाकीने आष्टीहून लगामकडे येत होते. त्याचवेळी चौडमपल्लीजवळ भूसुरुंगविरोधी वाहनाने जोरदार धडक दिली असता दुचाकीवरील एक तरुण ठार झाला, तर एक जण जखमी झाला आहे . जखमी व्यक्तीला तात्काळ आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रुग्णालयात हलविण्यात आले. अधिक तपास आष्टी ठाण्याचे पो.नि. विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भाऊराव वनकर आहेत.
हे ही वाचा,
Comments are closed.