Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अर्ध्या वेतनावर काम करुन घेण्याकरिता ठेका पद्धतीचा जन्म : कॉ. अमोल मारकवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,०९ : ठेका पद्धतीविरोधात कम्युनिस्ट नेत्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. ठेका पद्धतीद्वारे कर्मचाऱ्यांकडून कमी पैशात जास्त काम करुन घेण्याचं धोरण अवलंबले जात आहे. यात कर्मचाऱ्यांना सर्व सोयीसुविधांपासून दूर ठेवलं जात असल्याचा आरोप कम्युनिस्ट नेत्यांनी केली.

ठेका पद्धतीविरोधात पावलं उचलण्याचाठी अमोल मारकवार यांच्या अध्यक्षेतेखाली कम्युनिस्ट नेते आणि कर्मचाऱ्यांची बैठक आज पार पडली. कुरखेडा, आश्रम शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी बैठकीला हजेली लावली होती. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे, प्रविण मडावी, संतोष धोटे उपस्थित होते. यावेळी भाषणात लालाजी मडावी म्हणाले की, कायद्यापुढे सर्व समान आहेत. समान कामास समान वेतन असे तत्त्व सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ते कागदावरच आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ठेकापद्धतीविरोधात संघटितरित्या संघर्ष करणे काळाजी गरज- अमोल मारकवार

अमोल मारकवार म्हणाले की, कर्मचाऱ्यांना सर्व सोयी सवलती पासून दूर ठेवण्याकरीता ठेका पद्धतीचा जन्म झाला आहे. कालपर्यंत ही ठेका पद्धत खाजगी क्षेत्रात होती. आता तिचे आगमन शासकीय क्षेत्रात देखील झाले आहे. कायम कर्मचाऱ्यांना ४० ते ४५ हजार रुपये वेतन दिले जाते. तर तेच काम ठेका पद्धतीत दहा हजार रुपयात करुन घेतले जाते. वेतन कमी आणि भविष्याची निश्चिती नाही. अशी ही ठेकापद्धती हासुन पाडण्याकरीता संघटितरित्या संघर्ष करणे ही काळाजी गरज आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दिर्घकाळा पासून काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचान्यांना प्राधान्याने कामावर घ्या. या मागणीला ३ जुलै ला प्रकल्प अधिकारी गडचिरोली याची शिष्टमंडळाचे वतीने भेट घेऊन निवेदन देणार आहोत, अशी माहिती प्रविण मडावी यांनी दिली.

हे देखील वाचा –

 

Comments are closed.