अमरावतीत भाजपने काढली राज्य सरकारची प्रेतयात्रा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती २३ नोव्हेंबर :- लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आलेले अवाढव्य वीज बिल या विरोधात भाजपने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे आज अमरावतीच्या राजकमल चौकात भाजप महाविकास आघाडीचे प्रेत यात्रा काढून सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी “रामनाम सत्य है”च्या जोरदार घोषना करून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा पुतळा जाळून वीज बिलाची होळीही करण्यात आली.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात बडनेरा शहरातील ज्या लोकांना चुकीचे, प्रचंड वाढलेले व अव्वाच्या सव्वा वीज बिल आलेअसेल तर या बिलात सवलत देऊ, अशी घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली होती मात्र आता माफी मिळणार नाही अशी घोषणा ऊर्जा मंत्र्यांनी केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांनमध्ये रोष व्यक्त केला जात आहे, त्यामुळे आज महाविकासच्या निषेधार्थ आज अमरावतीत राज्य सरकारची प्रेत यात्रा काढण्यात आली,यावेळी ऊर्जामंत्री यांचा पुतळा जाळून वीज बिलाची होळी करण्यात आली. यात सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या..
Comments are closed.