धुळे जिल्ह्यातील भाजप माजी आमदार अनिल गोटे सह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई:-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.धुळे जिल्ह्यातील भाजपचे भरत पाटील, भास्कर पाटील, अनंतराव पाटील, बाळू पाटील, कपिल दामोदर, माजी संस्थापक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहर उपाध्यक्ष दिलीप पाटील, राजेंद्र गायकवाड यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, धुळे शहराध्यक्ष विजय वाघ, संयोजक प्रशांत भदाणे उपस्थित होते.
Comments are closed.