धक्का लागला म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांने आणि मुलाने केली एका दुकान दाराला मारहाण
पिता पुत्रा विरोधात स्थानिक तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विरार डेस्क 31 डिसेंबर :- नालासोपारा पूर्वेच्या गोल्डन ट्रेंड सेंटर मधले दुकानदार पराग गडा हे बाजारात जात असताना भाजप चे पदाधिकारी जॉन पीटर यांचा मुलगा बेकॉम पीटर याला किरकोळ धक्का लागला म्हणून या धक्क्या चा राग मना मधे ठेऊन बेकॉम पीटर ने दुकान दाराला दुकानात जाऊन चक्क 3 वेळा मारहाण केली आहे. दुकान परिसरात असलेल्या CCTV केमेऱ्यात आपण पाहू शकत असाल की कश्या प्रकारे भाजप चे पदाधिकारी जॉन पीटर त्यांचा मुलगा बेकॉम पीटर आणि त्याच्या मित्रांनी मारहाण करत आहेत. मारहाण झालेल्या दुकानदाराने स्थानिक तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मारहाणीत दुकान दाराला कानशिलात मारणारे हेच ते भाजप चे पदाधिकारी जॉन पीटर आहेत. जॉन पीटर यांनी अनेक राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. पण कुठेही त्याच फावल गेलं नसल्याने आता ते भाजप मधे राहून आपल्या दादागिरी च्या जोरावर बाजरा परिसरात दुकान दारांना दमदाटी करत असतात अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
Comments are closed.