Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

औरंगाबाद मधील महिलेच्या अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यात भाजपाचे आंदोलन

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी तर संजय राऊत यांच्यावर केली टीका –  माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. ३० डिसेंबर: औरंगाबादमध्ये तरुणीवर कारमध्ये झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज जालन्यात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र निदर्शनं करण्यात आली. शहरातील संभाजी उद्यानाच्या समोर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या आंदोलनात भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यां देखील सहभागी झाल्या होत्या. आंदोलना दरम्यान आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन परीसर दणाणून सोडला. राज्यात महिला अत्याचाराचं प्रमाण वाढत असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला सरकारने वाचवण्याचा प्रयत्न चालवला असून ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून 3 महिन्यात या केसचा निकाल लावावा अशी मागणी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आंदोलकांनी केली तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केलेल्या घृणास्पद प्रकाराचा जाहीर निषेध नोंदवला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संजय राऊत यांनी ईडीकडे चौकशीसाठी 5 दिवसांची मुभा मागितली आहे त्यावर बावनकुळे यांनी टीका केली. शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांच्यावर देखील टीका केली. जेव्हा राऊत यांच्यावर काही झालं की ते आगपाखड करतात मात्र दुसऱ्याच काही झालं तेव्हा ते मोठ-मोठे लेख लिहितात त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची भाषा न करता त्यांनी त्यांचे तोंड गप्प ठेवावे असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला. संजय राऊत यांनी दुसऱ्यावर टीका करण्याआधी स्वतःचा आरसा तपासावा आणि त्यांच्यावर आलेल्या वेळेतून बोध घ्यावा असा देखील सल्ला त्यांनी दिलाय.

यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, विभागीय संघटन मंत्री भाऊराव देशमुख, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुजित जोगस, संपत टकले, शत्रू कणसे, विक्रम उफाड, योगेश ढोणे, सचिन नारियालवाले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Comments are closed.