विधान परिषद निवडणुकीत भाजपचा धुव्वा – नागपूर, पुणे, औरंगाबादमध्ये महाविकास आघाडी विजयी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर दि. ४ डिसेंबर: राज्य विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला आहे. नागपूर पदविधर मतदारसंघ हा भाजपचा मानला जातो. तेथे केद्रीय मंत्री नितीन गडकरी एका निवडणुकीत अविरोध विजयी झाले होते. मात्र, नागपूरमध्ये भाजपचा पराभव हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना धक्का देणारा मानला जात आहे.
नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नागपूरमधून दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर हे गृहनगर आहे. गत २५ वर्षांपासून नागपूर महापालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. यावेळी भाजपने महापौर संदीप जोशी यांनाच मैदानात उतरविले ते फडणवीस यांचे उजवे हात समजले जातात. त्यामुळे नागपूर विभागाने भाजपचे संदीप जोशी यांना केलेला पराभव हा फडणवीस यांच्याकरिता सूचक संदेश देणारा आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील दिलजमाईने भाजपला धूळ चारली आहे.
पुणे पदविधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे अनुक्रमे अरुण लाड व जयंत आसगावकर यांनी बाजी मारली आहे. तेथे भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले.औरंगाबाद पदवीधरमध्ये फडणवीस यांचे खंदे समर्थक समजले जाणारे शिरीष बोराळकर यांना महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाण यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार स्पर्धेतूनच बाद झाले आहेत. औरंगाबादमध्येही भाजपचा पराभव झाला आहे. केवळ धुळे-नंदूरबारमध्ये आधी काँग्रेसमध्ये असलेले अमरिश पटेल यांनी भाजपची लाज राखली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष विजयी झालेले किरण सरनाईक हे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहे. त्यांचे मोठे बंधू अॅड. दिलीप सरनाईक अनेक वर्षे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तर त्यांच्या आई व आजोबा हे काँग्रेसच्या मोठ्या पदांवर राहिलेले आहेत.
Comments are closed.