Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काळीपिवळी टाटा मॅजिकला ट्रकची समोरासमोर धडक : १६ प्रवासी गंभीर जखमी, चालकासह २ ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मूल (जि. चंद्रपूर) : सिंदेवाही येथून प्रवासी घेऊन निघालेल्या काळीपिवळी टाटा मॅजिक वाहनाला चितेगाव गावाजवळ भीषण अपघाताचा सामना करावा लागला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या शासकीय धान्य वाहून नेणाऱ्या ट्रकने समोरासमोर धडक दिल्याने या अपघातात मॅजिक चालकासह २ जणांचा मृत्यू झाला असून १६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. मॅजिक चालक निर्दोष मोहूर्ले (वय अंदाजे ३२) हा अपघातात जागीच ठार झाला. तर गंभीर जखमींमधील मनाबाई सिडाम (वय ४५) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींवर मूल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ट्रक चालक नशेत असल्याचा संशय..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अपघातात वाचलेल्या काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने वेगात आणि बेजबाबदारपणे वाहन चालवत असताना समोरून येणाऱ्या मॅजिकला जोरदार धडक दिली.

अवैध वाहतुकीचा गंभीर प्रकार उघड..

अपघातग्रस्त टाटा मॅजिकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे तब्बल १६ प्रवाशी कोंबले गेले होते. ही बाब जिल्ह्यातील अवैध व बेफाम प्रवासी वाहतुकीचा गंभीर प्रश्न अधोरेखित करत आहे. स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांचा तपास सुरू

या दुर्घटनेनंतर मूल पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताची कारणमीमांसा सुरू आहे. ट्रक चालकाच्या वैद्यकीय चाचण्या करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Comments are closed.