Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या बोलेरो ने घेतल्या तीन पलट्या; एक गंभीर सात किरकोळ जखमी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, दि. ३० नोव्हेंबर: वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील बोर नदीवरील पुलावर लग्न वराडी घेऊन जाणारी बोलेरो आज ३० रोजी सकाळच्या सुमारास गाडीचे स्टेरिंग लॉक झाल्यामुळे पलटी झाली. यात १ गँभीर तर ६ जण किरकोळ जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील देवळी सावंगी तालुका हिंगणा येथून MH 36 H 3273 महिंद्रा बोलेरो चालकासह ८ प्रवासी घेऊन वर्धा जिल्ह्यातील पुलगाव जवळील दहेगाव मिस्किन येथे जात असताना सेलू येथील बोर नदीवरील पूलावर गाडी येताच गाडीचे स्टेरिंग लॉक झाल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडीने तीन पलट्या घेतल्या त्यामध्ये पूर्वा मोरेश्वर राऊत ( ५) रा. देवळी सावंगी ही बालिका गंभीर जखमी झाली असून तिचेवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार चालू आहे तसेच गाडी चालक उमेश चंद्रशेखर कापसे (28) वर्ष रा. देवळी सावंगी यांचे कमरेला तशीच पायाला जबर दुखापत झाली. गाडीतील उर्वरित ६ जण किरकोळ जखमी असल्यामुळे त्यांची दुसऱ्या वाहनाने रवानगी करण्यात आली. पुढील तपास सेलू पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाडे यांचे मार्गदर्शनात रविष कुमार रघाटाटे. अखिलेश गव्हाणे करीत आहे.
गाडीने तीन पलटी घेताच कुणाची वाट न पाहता तत्काळ जखमी प्रवाशांना सेलूतील युवावर्ग स्वप्निल तळवेकर, फैजल शेख, मुन्ना गावंडे, धनराज वैद्य यांनी बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

Comments are closed.