वरोरा जवळील येन्सा गावाजवळ बर्निंग कार चा थरार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर :२० डिसेंबर
हिंगणघाट येथून चंद्रपूरकडे येत असलेल्या एका चारचाकी वाहनाने रस्त्यात अचानक पेट घेतला. वाहनातील सर्व प्रवाशी समयसुचकता बाळगत खाली उतरले. त्यामुळे जिवीतहानी झाली नाही. मात्र, वाहन जळून खाक झाले. ही घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वरोडा पोलिस ठाणे अंतर्गत येणार्या येनसा गावाजवळ रविवार, 20 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांनी घटनास्थळी दाखल झाले. वरोडा नगरपरिषदेचे अग्निशमक पथकाला बोलावून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत कार पूर्णत: जळून खाक झाली होती.
Comments are closed.