Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समाज उपयोगी उपक्रम राबवून गणेश भुरकुंड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

वसई, 7 जून-  माणूस नेहमी संपत्ती किंवा पैशानेच नव्हे तर त्याच्या कर्तृत्वाने आणि समाजाप्रती असलेल्या चांगल्या दृष्टिकोनामुळे मोठा होत असतो. असेच एक व्यक्तित्त्व म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आणि श्रमजीवी कामगार संघटनेचे वसई तालुका अध्यक्ष गणेश सुरेश भुरकुंड. ७ जून या गणेश भुरकुंड यांच्या वाढदिवसा निमित्त वसईच्या पापडी येथील विजयी ब्लड बँक येथे खास रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश यांच्या मित्र परिवाराने रक्तदान करून आताच्या पार्टी बहाद्दर तरुणाईला एक चांगला संदेश दिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवून आणि तरुणांना योग्य मार्गदर्शन करत, वेगवेगळे उद्योग धंदे करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गणेश भुरकुंड यांच्या वाढदिवसानिमित्त आज वसईत अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वसईच्या पापडी येथील विजयी ब्लड बँक येथे गणेश भुरकुंड यांनी स्वतः आणि त्यांच्या मित्र परिवाराने 37 रक्त पिशव्या रक्तदान केले. तसेच Royaline Group of Companies, F & G Developers , सम्राट प्रतिष्ठान, स्वराज प्रतिष्ठान तसेच जनकल्याण ब.ग. यांच्यामार्फत संध्याकाळी मांडवी येथील हिल रिसॉर्ट- येथे अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी गणेश भुरकुंड यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.