संत सेवालाल महाराज यांची 282 वी जयंती साध्या पध्दतीने साजरी
वाशीम, दि. १५ फेब्रुवारी: बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांची आज 282 वी जयंती पोहरादेवी येथे साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. दरवर्षी जयंतीनिमित्त लाखो भाविक पोहरादेवी येथे येतात मात्र यंदा कोरोनाच्या महामारीमुळे मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने कोविड च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं बंजारा समाज बांधवाणी पोहरादेवी गावात मिरवणूक काढून साजरी करण्यात आली.
जिल्ह्यातील बंजारा बांधवांची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या जन्मोत्सवासाठी देशभरातील हजारो बंजारा समाजबांधव आज पोहरादेवी मध्ये दाखल झाले आहेत. जन्मोत्सवानिमित आज सेवालाल महाराजांच्या पालखीची पोहरादेवी गावातून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली.यावेळी अनेक दिंड्या पोहरादेवी येथे दाखल झाल्या आहेत.
दरवर्षी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोहरादेवी येथे देशभरातून पाच लाखाहून अधिक भाविक येतात मात्र यंदा कोरोना मुळे पोहरादेवी येथील महंतांनी जिथे आहात तेथूनच जयंती साजरी करण्याचं आव्हान केलं असल्याचं जगदंबा संस्थान चे महंत सुनील महाराज यांनी सांगितलं. आमचं दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही पोहरादेवी येथे घरातील सर्व मंडळी येत असतो.मात्र यंदा कोरोनामुळे आम्ही साध्या पध्दतीने दर्शन घेऊन जात असल्याचं भाविक सांगतात.
Comments are closed.