Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार दिन साजरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली 31 जानेवारी :- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक दुर्लक्षित उष्णकटीबंधीय आजार दिन दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी संजय मिना,मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशीर्वाद,सहाय्यक संचालक,आरोग्य सेवा (हिवताप) नागपूर,डॉ.श्याम निमगडे,जागतिक आरोग्य संघटना,सल्लागार नागपूर विभाग,डॉ. भाग्यश्री त्रीदेवी,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय जठार,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.सुनील मडावी,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक हजर होते.

जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील 17 आजारांची गणना दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार अशी केलेली आहे. या 17 आजारात हत्तीरोग या आजाराचा समावेश आहे. या आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आवाहन सर्व देशांना जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. हत्तीरोगामुळे कुणाचाही मृत्यु होत नाही त्यामुळे या रोगाची तीव्रता कमी आहे परंतु या आजारामुळे हत्तीरोग रुग्णांचे सामाजिक व व्ययक्तिक आयुष्य उध्वस्त होते.हत्तीरोग हा जंतासारख्या परजीवीमुळे व क्युलेक्स डासामार्फत होणारा संक्रमक आजार आहे. कुलेक्स डासाची उत्पत्ती सांडपाणी,सेप्टिक टैंक,गटारी अश्या घाण पाण्यात मोठ्या प्रमाणात होते.डास चावल्याने हत्तीरोगाचे जंतू माणसाच्या रक्तात सोडले जातात तेथे त्यांची वाढ मोठ्या कृमीमध्ये होते.मोठ्या कृमी लासिकाग्रंथी व लसिकावाहिन्यात राहत असल्याने हाताला आणि विशेष करून पायाला सूज येऊ लागते व हा पाय हत्तीच्या पायासारखा मोठा दिसू लागतो आणि म्हणूनच या आजाराला हत्त्तीपाय असेही म्हटले जाते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्य म्हणजे एकदा सुजलेला पाय पुन्हा पूर्ववत करण्याचे कोणतेही उपाय नाहीत.या सुजलेल्या पायाला इतर जीवाणूचे इन्फेक्शन होऊन तिथे असह्य वेदना होऊ लागतात,ताप येतो,हत्तीरोगात पायाला सूज येते तसेच काही पुरुष रुग्णामध्ये अंडाशयाला सूज येऊन अंडाशय मोठे होते.इंग्रजीत याला हायड्रोसिल म्हणतात.हायड्रोसिलचा त्रास शस्त्रक्रियेद्वारा दूर केल्या जाऊ शकतो.

जिल्ह्यातील चामोर्शी व आरमोरी या दोन तालुक्यात 10 फेबुवारी ते 20 फेबुवारी 2023 पासून हत्तीरोग दुरिकरन सामुदायिक औषधउपचार मोहीम सुरु करण्यात येत आहे.आपल्या भागातून हत्तीरोगाला हद्दपार करण्यासाठी आपण सर्वांनी या एक दिवसीय सामुदायिक औषधउपचार मोहीमेस सहकार्य करावे.या सोबतच आपल्या भागातील हत्तीरोग रुग्णास मदत करणे,त्यांचे मनोधेर्य वाढवीने,अंडवृद्धी रुग्णास शस्त्रक्रीयेकारिता प्रवृत्त करणे,हत्तीपाय रुग्णास पायाची निगा घेण्यास सांगणे अशी अनेक कामे करून आपण हत्तीरोगावर नियंत्रण मिळवू शकतो असे आवाहन जागतिक दुर्लक्षित उष्णकटीबंधीय आजार दिनानिमित्य जिल्हाधिकारी यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

https://www.youtube.com/live/rXU0sHfiNb0?feature=share

 

Comments are closed.