सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपीकांची केंद्रीय पथकाकडून पहाणी
विजय साळी – जालना, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. २२ डिसेंबर: ऑक्टोबर महीन्यात तीन ते चार वेळा झालेल्या अतिवृष्टीने बाधित शेत व शेतपिकांचा पाहणी दौरा केंद्रीय पथकातील अधिकारी संचालक कृषी मंत्रालय, नागपुर आर.पी सिंग, अधिक्षक अभियंता निरीक्षण केंद्र, नागपुर एम.एस.सहारे यांनी आज केला. सलग दुसऱ्या दिवशीही त्यांनी जालना तालुक्यातील गोलपांगरी जवळील गणेश नगर येथील शेतकरी शशिकला रामभाऊ कावळे यांच्या शेतीस प्रत्यक्ष भेट देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
1 एकर असलेल्या शेतात शशिकला कावळे यांनी सोयाबीन लावले होते, आणि अतिवृष्टी मुळे यांच्या शेतात जवळपास दीड ते दोन फूट पाणी जमा झाले होते,पावसाच्या पाण्याचा निचरा ना झाल्यामुळे शेतात पाणी तसेच जमा होते,परिणामी सोयाबीन चे हातचे पीक वाया गेले,यानंतर शासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आले त्यानंतर 1750 रुपये अनुदान शशिकला कावळे यांच्या खात्यावर जमा झाले,अजून अनुदानाचा दुसरा हप्ता येणे बाकी असून आज केंद्रीय पथकाने गोलपांगरी जवळील गणेशनगर येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, यावेळी केंद्रीय पथकासोबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा,जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते, केंद्रीय पथक आज येऊन पाहणी करून गेले परंतु लवकरात लवकर आणखीन मदत मिळावी अशी अपेक्षा या वेळी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
कलक्सह या पथकाने बदनापुर तालुक्यातील वाकुळणी, बाजार वाहेगाव, रोशनगाव येथील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीची पाहणी करुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या होत्या, आज सलग दुसऱ्या दिवशीही त्यांनी जालना तालुक्यातील गणेशनगर येथील शेतकऱ्यांशी चर्चा करीत प्रत्यक्ष पाहणी केली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Comments are closed.