Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

चंद्रपूर, दि. 28 ऑक्टोंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार 29 ऑक्टोंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 29 ऑक्टोबरला सकाळी 10:30 वाजता खांबाळा ता. वरोरा येथे नागपूरहून आगमन व आरोग्य उपकेंद्र, खांबाळाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सकाळी 10:45 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खांबाळा येथील दोन खोली शाळा इमारतीच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहतील. सकाळी 11:00 वाजता खांबाळा ता. वरोरा येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

दुपारी 12:00 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर, येथे आगमन व राखीव. दुपारी 1:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर, येथे व्ह‍िडिओ कॉन्फरन्सद्वारे मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थिती. दुपारी 2.50 वाजता नियोजन भवन, चंद्रपूर येथे कोविड-19 बाबत मोबाईल टेस्टिंग व्हॅन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुपारी 3:00 वाजता नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5:30 वाजता नियोजन भवन येथे पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील. सायंकाळी 7:00 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण करतील.

Comments are closed.