चंद्रपूर जिल्ह्यात आज 162 कोरोनामुक्त तर 168 नव्याने पॉझिटिव्ह ; दोघांचा मृत्यू.
- आतापर्यंत 18,066 बाधित झाले बरे.
- उपचार घेत असलेले बाधित 1,909.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. 2 डिसेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 162 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 168 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 20 हजार 283 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 18 हजार 66 झाली आहे. सध्या एक हजार 909 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 51 हजार 900 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 29 हजार 371 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्या बाधितामध्ये वरोरा शहरातील 48 वर्षीय पुरूष व चंद्रपूर तालुक्यातील घंटाचौकी येथील 47 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 308 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 285, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 168 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 53, चंद्रपूर तालुक्यातील सहा, बल्लारपुर तालुक्यातील आठ, भद्रावती 34, ब्रम्हपुरी नऊ, नागभिड सात, मुल दोन, सावली दोन, गोंडपीपरी दोन, राजुरा सहा, चिमुर 23, वरोरा 10, कोरपना चार व इतर ठिकाणच्या 2 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
Comments are closed.