चंद्रपूर महानगरपालीका हद्दित रात्री जमावबंदी
चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असल्याचे आदेश चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहेत. सदर आदेश दिनांक 5 जानेवारी 2021 पर्यंत लागू राहतील.
वैद्यकीय व आपातकालीन सेवेतील तसेच कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदरील आदेश लागू राहणार नाही.
आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड सहिता, साथरोग कायदा व इतर संबंधीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Comments are closed.