मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयना-पोफळी जलविद्युत प्रकल्प, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या नवीन मार्गिकेची पाहणी करणार.
सातारा, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यांचा दौऱा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि.९ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (गुरूवार दि. १० डिसेंबर) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी करतील.
मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
गुरूवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ९.०५ वा. जुहू विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगर (ता.पाटण, जि. सातारा) कडे प्रयाण.
स. १०.०० वा. कोयनानगर हेलिपॅडवर आगमन व मोटारीने रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्पाकडे प्रयाण.
स. १०.५० वा. पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा ४ विद्युतगृहाची पाहणी.
स. ११.२० वा मोटारीने कोयना धरण (ता.पाटण, जि. सातारा)कडे प्रयाण.
दुपारी १२.०५ वा. कोयना धरण येथे आगमन व परिसराची पाहणी.
दु. १२. ४० वा कोयना विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
दु.१.१० वा. मोटारीने कोयनानगर हेलिपॅडकडे प्रयाण व हेलिकॉप्टरने ओझर्डे (ता. मावळ, जि. पुणे) कडे प्रयाण.
दु.२.०० वा. ओझर्डे हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्र. २ च्या प्रकल्पस्थळाकडे प्रयाण.
दु. २.२० वा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची पाहणी व त्यानंतर मोटारीने प्रकल्पाच्या कॅम्प ऑफिसकडे प्रयाण.
दु. २.५० वा. कॅम्प ऑफिस येथे आगमन व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली-कुसगाव दरम्यानच्या नवीन बांधकामाचे सादरीकरण.
दु. ३.१५ वा. मोटारीने ओझर्डे (ता.मावळ, जि. पुणे) हेलिपॅडकडे प्रयाण.
दु. ३.३० वा. ओझर्डे हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.
Comments are closed.